Fandry Theme Song Lyrics Tuzya Priticha Vinchu Chawla – Ajay Atul

कवी/संगीतकार/गायक- अजय-अतुल.

Fandry Theme Song Lyrics Tuzya Priticha Vinchu Chawla – Ajay Atul:

Check lyrics of beautiful theme song. Lyrics are in Marathi font.

तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…

जीव झाला येडा-पिसा, रात-रात जागणं…
पुरं दिस-भर, तुझ्या फिरतो मागं-मागणं…

जीव झाला येडा-पिसा, रात-रात जागणं…
पुरं दिस-भर, तुझ्या फिरतो मागं-मागणं…
जादू मंतरली कुणी, सपनात जागपनी,
नशिबी भोग असा दावला…

तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना…

भिर भिर मनाला ह्या घालू कसा बांध गं…
अवसेची रात मी, अनं पुनवंचा तू चांद गं…
नजरेत मावतीया, तरी दूर धावतीया…
मनीचा ठाव तुझ्या मिळणा…

आता थोरा-मोरं घास तरी गीळणां…
देवा जळून-जळून जीव, प्रीत जुळणां हं…
सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली,
तरी झाली कुठं चूक मला कळणां…

सांभी कोप-यात उभा एकाला कधीचा,
लाज ना कशाची, तक्रार नाही…
भास वाटतोया, हे खर का सपान,
सुखाच्या ह्या सपनाला थार नाही…

हे रात झाली जगण्याची हाय तरी जिता,
होय प्रेम माझं, अन भाबडी कथा…
बघ, जगतूया कसं, साऱ्या जन्माचं हसं,
जीव चिमटीत असा गावला…

तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना…

2 comments

  1. it’s not complete :)
    Last stanza is not there…
    Please update

Leave a Reply